संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती मंठा शहरात उत्साहात साजरी..
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
मंठा शहरामध्ये दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत रविदास महाराज यांच्या भव्य प्रतिमेची रथ मिरवणूक,शोभायात्रा काढण्यात आली.
ही मिरवणूक छत्रपती संभाजी राजे चौक येथून काढण्यात आली पुढे शहरातून मिरवणूक काढत बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आश्वारूढ पुतळाल्या पुष्पहार घालून अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री माधव गायकवाड साहेब ,श्री नरहरी सोनवणे मराठवाडा संघटक राष्ट्रीय चर्मकार महासंघ, श्री मुरलीधर जी ठोंबरे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी, श्री बाळासाहेब बोराडे - नगराध्यक्ष नगरपंचायत मंठा ,अचित नाना बोराडे गटनेते नगरपंचायत मंठा , जेके कुरेशी उपाध्यक्ष नगरपंचायत मंठा, महादेव वाघमारे , राजेश मोरे, उदय दादा बोराडे ,नगरसेवक दीपक बोराडे, नारायण दवणे , गणेश बोराडे ,नगरसेवक अरुण वाघमारे , शरद मोरे , विठ्ठल वाघमारे , विष्णुपंत घोडके , बाबासाहेब हनवते ,कैलास कांबळे ,प्रल्हाद शेळके, विश्वनाथ हनवते, मदनराव अंभोरे ,हरिभाऊ वाघमारे, लक्ष्मण टोम्पे ,अंकुश शिंदे, अशोक घायाळ,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन कांबळे ,पवन गुजर ,विष्णू पंढरी ,अशोक शिंदे ,संजय हनवते ,बालाजी वाघमारे ,सचिन वाघमारे, विठ्ठल जिगे ,दीपक हनवते, सचिन वाघमारे ,आयोजक श्री अंबादास घायाळ तालुका अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ ,प्रभू शिंदे तालुका अध्यक्ष ,हरिकिशन वाघमारे -तालुका सचिव ,खंडू लहाने ,भगवान आंबोरे ,विजय अंभोरे ,महाप्रसादाचे आयोजक रामभाऊ गवळी व सचिन शिंदे मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बळीराम वाघमारे सर तर आभार प्रदर्शन सोपान वाघमारे सर यांनी केले. व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र परतूर चे तालुका सहसचिव कुलदीप बिनगे, तसेच केशव सरकटे, नितीन शिंदे, सर्व समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.