कोरोना काळात गोरगरीब सामान्य जनतेचे जीव वाचवण्यात डॉक्टर प्रफुल्ल पाटलांचे महत्त्वाचे योगदान डॉक्टर प्रफुल्ल पाटलांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात घेतली भरारी - आमदार लोणीकर
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दिनांक 12 फेब्रुवारी 2023
विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करत शासकीय प्रशासकीय राजकीय उद्योग क्षेत्रामध्ये झेप घ्यावी असे प्रतिपादन माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. ते परभणी येथे आयोजित धन्वंतरी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन परभणीच्या 25 वर्षे सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार संदीपजी धुर्वे माजी आमदार शोभा अनंतराव देवसरकर
जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष आंबट जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव जिल्हा उपाध्यक्ष माधवराव चव्हाण भाजपा जेष्ठ नेते नागोराव कदम मानवत ह भ प राम महाराज काजळे ह भ प बंडु महाराज धर्मे ह भ प बबरूवान महाराज शेंडगे ह भ प उद्धव महाराज भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ सभापती राजेश मोरे डॉक्टर विद्या पाटील श्रीमती श्रीकांत पाटील सुभाषराव मस्के डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर जयश्री बेडसे पाटील सौ कांताबाई जारे सौ ज्योती मिलखे डॉक्टर तरल पाटील डॉक्टर सोनिया देवसरकर डॉक्टर नीरज पाटील डॉक्टर तनया इंगळे मोहन कुमार पाटील डॉक्टर सदानंद इंगळे डॉक्टर प्रकाश पाटील राम देवसरकर अभय मिलखे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की धन्वंतरी शिक्षण संस्थेचे काम हे तळागाळातील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना खऱ्या अर्थाने समाजाच्या सेवेसाठी तयार करण्याचे असून हे काम अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत लोणीकर यांनी संस्थेचे कौतुक केले. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की धन्वंतरी शिक्षण संस्थेचे काम हे कौतुकास्पद असून या संस्थेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामधील युवतींना आणि युवकांना खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने केले आहे. या नर्सिंग कॉलेज ने परभणी जिल्ह्याच्या आरोग्य विकासात भर पडली असून. डॉक्टर प्रफुल्ल पाटील उच्च दर्जाचे मेडिकल कॉलेज व्हावे या करीता प्रयत्नशील असून मी पूर्ण पणे त्यांच्या सोबत आहे.
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते मुलींच्या वस्तीगृहाचे भूमिपूजन फूड कोर्ट इमारतीचे भूमिपूजन त्याचबरोबर बस थांबा व रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.