जीवनात वावरतांना सर्वांचे हिताचे रक्षण करा- रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज
परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण
रामकथा हि परिवर्तनाची कथा आहे जो प्रयन्त माणसाच्या जीवनात परिवर्तन होल नाही तो प्रयन्त माणसाची प्रगती होत नाही. जीवनात वावरतांना सर्वांचे हिता चे निर्णय घ्या असे प्रतिपादन रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज यांनी केले. मा.आ. सुरेशकुमार जेथलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथील अयोध्या नगरीत सुरू असलेल्या रामकाथे च्या तिसर्या दिवशी रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज भाविकांना मंत्रमुग्ध करत होते. रामकनिरुपण करतांना रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज यांनी रामसीतेच्या लग्न सोहळ्याचे वर्णन संदर्भासह दृष्टांत देऊन विशद केले.
माणसाने अनुभवी माणसाचे ऐकले पाहिजे चूक झाली असेल तर मान्य करा. संसारात सुख नांदेल लोकांत बिगडला तर एकांत साबूत ठेवा एकांत बिगडला तर समाधान मिळणार नाही आणि समाधान नसेल तर त्याच्या सारखे दुःख कोणतेच नाही. धर्म, संस्कार जपा अहंकार बाळगू नका या मुळे आपल्या जीवनाला निश्चित पणे आकार मिळेल व जीवन समृद्ध झाल्याची प्रचिती येईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह परळी चे म.नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,नंदकिशोर लोहिया,सतीश सेठ बलदवा पैठण,श्यामजी लोहिया पैठण,बालाभाऊ भुमरे,दशरथ दाजी सोनवणे,डॉ.सतीश मुंदडा, राजेश परिहार,भिकुसेठ लोहिया,गोविंदजी अजमेरा परभणी,अमोलजी लोहिया पाथरी,शासकीय गुत्तेदार आर.बी घोडके,सेलू,काकडे साहेब सेलू,संजय सावंत,कौशल्या सावंत,लक्ष्मणराव ठेकाळे,दत्ता भगस,पंढरीनाथजी चव्हाण,अशोकनाना काकडे,दिलीपराव खरात,तुळशीराम निकाळजे,विनायक अप्पा खरात,हरणाची आढाव,कैलशराव सोळंके, दत्तराव बेरगुडे,बापुतात्या सोळंके,प्रसाद खरात,भानूदास टेकाडे,ज्ञानेश्वर माऊली गायवळ,आनिकरव डवले,दिलीपराव अंभुरे,विठ्ठलराव अंभुरे,दिनकरराव बेरगुडे,अप्पासाहेब खंदारे,बापूराव धुमाळ,संतरामजी राजबिंडे,अंकुशराव अवचार,प्रल्हादराव बोराडे,श्रीराम राठोड,बापूराव आढाव,माधुकरराव खंदारे यांच्या सह परिसरतील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान सांयकाळी याच ठिकाणी रामायनाचार्य ह.भ.प संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन पार पडले यावेळी मोठया संखेने महिला पुरुष भक्तांची उपस्थीती होती