होणाऱ्या पत्नीचा खून करणारा अखेर जेरबंद, परतूर- सेवली पोलिसांची कामगिरी,मोबाईल लोकेशनवरून शोधले
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने होणाऱ्या पत्नीचा अत्याचार करून गळा चिरून खून केल्याची घटना मंठा तालुक्यातील बेलोरा गावात १८ फेब्रुवारी दुपारी घडली होती. दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे.
परतूर पोलिसांनी आरोपीला सुशील सुभाष पवार याना परतूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केले यावेळी उपविभागीय अधिकारी राजू मोरे,पोलीस कर्मचारी दिसत आहे
या प्रकरणातील संशयित सुशील सुभाष पवार (रा. वरुड, ता. मेहकर) हा फरार झाला होता. मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेऊन त्याला मुंबई येथील वसई उपनगर भागातील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे. बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. येत्या १७ मार्च रोजी विवाह असल्याने १८ फेब्रुवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून सुशील पवार याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. घटनास्थळी गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला होता. या प्रकरणी मयत मुलीचे वडील संदीप
जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित सुशील पवार याच्याविरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन पाहिले असता, तो मुंबई येथील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी याची माहिती माणिकपूर पोलिसांना दिली तेथून त्याला ताब्यात घेऊन सेवली पोलिसांच्या स्वाधीन केले.यानंतर त्याला जालना येथे आणण्यात आले . ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नित्यानंद उबाळे, पोउपनि भागवत कदम, पोलिस कर्मचारी धनंजय लोढे, संतोष चव्हाण, शिपाई काळे,पो.को.शुभम ढोबळे, गजानन खरात, यांनी केली आहे.
---------
दुचाकी सापडली
■ दोन पथके सुशील पवार याचा मागील तीन दिवसांपासून शोध घेत होते. त्याची दुचाकी सोमवारी बुलडाणा जिल्ह्यात मिळवून आली होती. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी त्याच्या फोटोसह समाजमाध्यमांवर माहिती प्रसारित केली होती. तसेच राज्यभरातील ठाण्यांना माहिती कळवली