तळणी परीसरात गारपीट,शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तळणी प्रतीनीधी रवी पाटील
गारपीटग्रस्त शेतकर्योना मदतीसाठी ३३ टक्के नुकसानीच्या अटीची आड खाठी
तळणी येथे काल झालेल्या गारपीटग्रस्त ठिकाणची पाहणी मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे यानी केली ज्वारी आणि कांदा पिक असलेल्या ठिकाणची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला या पाहणी दरम्यान मंठा कुषी अधिकारी व्ही जी राठोड मंडळ अधीकारी भगवान घुगे कृषी मंडळ अधिकारी आर आर आघाव तलाठी गोपाल कुटे तळणी चे गौतम सदावर्ते उंपसरपंच विश्वनाथसिंग चंदेल ज्ञानेश्वर सरकटे .करीम पठाण गजानन सरकटे शेतकरी विश्वबंर सरकटे बाबूमामा रणमूळे उपस्थीत होते
यावेळी तहसीलदार वाघमारे यांनी सांगितले की शासनाच्या ३३ टक्के नुकसानीची अटीच्या अधीन राहुनच शेतकर्यांना मदत होऊ शकते बहुताश शेतकर्यानी गहु व हरभरा सुरक्षीत ठेवला असून पीक विमा भरणा करणार्या शेतकर्या पिक विमा कंपनीकडे तक्रार करण्याच्या सुचना वाघमारे यानी दिल्या तसेच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे या दोन दिवसात आणखी काही नुकसान झाले तर नुकसान ग्रस्त शेतीची पंचनामे करण्यात येतील असे वाघमारे यांनी सांगीतले सद्यस्थितीत ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जनावाराना चारा व ज्वारीच्या उत्पादनाला फटका बसणार असल्याचे शेतकरी बाबूराव रणमुळे यानी सांगीतले
तर यावेळी सिडस कादा उत्पादक शेतकरी विश्वबर सरकटे यानी तहसीलदाराला काद्याचे नुकसान गारपीटीने कशे होते याचे प्रात्यक्षीक स्वरुपात दाखवून दिले
तळणी परीसरात काल झालेल्या गारपीटीमुळे शेतकर्याचे ज्वारी गहू कांदा याचे नुकसान झाले नुकसान ग्रस्त शेतीचे .पंचनामे करून शेतकर्याना मदत करावी अशी मागणी सरपंच गौतम सदावर्ते यानी तहसीलदाराकडे केली