परतूर येथे स् आनंद शाळेत टुडंट्स लीड कॉन्फरन्स उत्साहात संपन्न.
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
आनंद इंग्लिश स्कूल परतूर येथे पॉवर बाय लीड च्या मार्गदर्शनाखाली स्टुडंट्स लीड कॉन्फरन्स घेन्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन संजिवनीताई खालापुरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमच्या अध्यक्ष डॉ लता पुरी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मनिषा कदम, प्रमुख पाहुणे सौ शोभा कदम , श्रीमती सत्यशीला तौर होत्या.
विद्यार्थ्यांनी रोबोट ,अन्नसाखळी, सोलार सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, हृदयाची कार्यप्रणाली, सेव्ह अर्थ, पवनचक्की ,प्रकाश संश्लेषण क्रिया ,उष्णता मापक यंत्र ,एटीएम मशीन, चुंबकाचे परिणाम, सॅटॅलाइट कार्यप्रणाली, किडनी इत्यादी प्रयोगाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यासाठी पालकांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाचे मोठ्या आत्मविश्वासाने सादरीकरण केले. परतुर शहरामधील कृतीतुन व प्रयोगातुन शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे आनंद इंग्लीश शाळा असे मत अनेक पालकांनी मांडले यावेळी.
पालक व परतुर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलिया मॅडम , प्रास्ताविक अर्चना जाधव यांनी केले . तर आभार प्रदर्शन श्रीमती उषा मगर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.