महावितरण परतूर येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा.
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
येथील महावितरण कंपनी मध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.उन वारा पावसाची तमा न बाळगता परिस्तिथी कोणतीही असो प्रामाणिक पणे वीज ग्रहकाना सेवा देणाऱ्या लाईनमन चा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .
लाईनमन मंजे प्रकाश दुत असून वीज वितरण कंपनीचे मुख्य घटक आहेत.वीज ग्रहकानी लाईनमन ला सन्मानाची वागणूक द्याला पाहिजे. अन्न,वस्त्र,निवारा या ही पेक्षा वीज महत्वाची झाली आहे त्या मुळे वीज सेवा पुरवणाऱ्या लाईनमन चे समाजाने आभार मानले पाहिजे असे गोरव उदगार परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वीज वितरण सलागर समितीचे मा. अध्यश भगवानराव मोरे हे प्रमुख पाहुणे मनून बोलत होते.
या कार्यक्रमास वीज वितरण परतुरचे प्र. उपकार्यकारी अभियंता पी. एस. गणेर, सह्याक अभियंते मंगेश रामटेके, एन. टी.केंद्रे,महेश मोरखडे कर्मचारी शाम पाठक,रमेश आढाव, लाईनमन जी. ए.चेंदेल,रामदास वायल,रवींद्र वणवे, रामेश्वर भामट , हनुमान काळे, विठल आघाव, विलास खरात, सचिन जैद, नदीम शेख, राम पवार , निळू सोळंके,प्रकाश ताठे, रंगनाथ भुंबर, दाता कष्टे, पंचफुला कोटणक, आदी सर्व लाईनमन उपस्थित होते.