विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी
जालना प्रतिनिधी समाधान खरात
शहरात मागील महिन्याच्या ३० तारखेला राम नवमी मिरवणुकी दरम्यान जुना जालना भागातील हॉटेल व्यावसायिक विष्णू उर्फ विकी श्रीराम सुपारकर यांची छातीत चाकूने वार करून निघून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे मयत यास 2 वर्षाचा छोटा मुलगा असून, ज्या दिवशी अंत्यसंसकार करण्यात आले त्याच दिवशी मुलगी जन्माला आली. अश्या एका क्लेशदाई घटनेचा अनुभव सुपारकर परिवारास आला. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी त्याब्यात घेतले होते, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान आज दी. 12 एप्रिल रोजी शहरातील नागरिकांच्या वतीने आरोपींना फाशीची शिक्षा, 15 दिवसात दोषारोप पत्र दाखल करावे, आरोपींवर मोक्का कायदा व MPDA कायद्याने कारवाई करावी, तसेच उच्च अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा ई. मागणी करत लाड गवळी समाज व मित्र परिवार आणि शहरातील नागरिकांच्या वतीने शनी मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत मुक मोर्चा काढला.