बुद्धभूषण मित्र मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती निमित्त अन्नदान
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येथील बुद्धभूषण मित्र मंडळाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महादेव मंदिर चौक येथे अन्नदान करण्यात आले. परतुर शहरासह तसेच तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच विविध नेते मंडळी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये सहभाग घेतला होता. बुद्धभूषण मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल पहाडे हे दरवर्षी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान करत आले आहे. तसेच यापुढेही आपण हे सामाजिक कार्य चालू ठेवणार आहे असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी स्वप्निल पहाडे, तुषार पहाडे, अमोल पहाडे, सुनील पहाडे, रवि घोडे, सतीश पहाडे, राहुल पहाडे, आकाश पहाडे, निलेश पहाडे, अनिल पहाडे, कृष्णा वाघमारे, अनिकेत सोनपसारे, रूपेश पहाडे, संकेत सोनपसारे, सूरज पहाडे, आदर्श सोनपसारे, अजय निकाळजे, विकास पहाडे, बाला पहाडे, इंद्रजीत गायकवाड, अमरदीप सुतार, अमोल नाथभजन, गौतम प्रधान, अनिल जहार, दत्ता एक्कीलवाले, परमेश्वर बिल्लारे, सागर काजळे, पपु घायताड़क, इरफान शेख, भगवान साळवे, विशाल भादर्गे, किरण प्रधान, मिलिंद गायकवाड, अभि सुतार, प्रकाश प्रधान, विजय नाथभजन, विशाल साळवे, दिपक एक्कीलवाले, सागर पहाडे, पवन निकाळजे, वैभव डुकरे, साई मुपडे, दिपक नाथभजन, दत्ता लोखंडे, अरुण पवार, शिव पवार सह आदींनी परिश्रम घेतले.