दिव्यांगाच्या पेन्शन वाढ संदर्भात दिशाभूल-अशोक तनपुरे
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
परतुर दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासाठी अनेक निवेदन उपोषण प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली पण निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाचशे रुपयाची वाढ करण्यात आली असे विविध पत्रकामध्ये माहिती देण्यात आली
अशा महागाईच्या काळात दिव्यांगांना व निराधार प्रत्येकी पाच हजार रुपये महिना पेन्शन करावे यासाठी राज्यामध्ये विविध उपोषण मोर्चे लेखी निवेदन देण्यात आली होती राज्य सरकारने मार्च महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत 5000 महिना केला नाही पण पाचशे रुपयाची वाढ करण्यात आली होती आणि एक एप्रिल पासून दिव्यांग व निराधार यांच्या पेन्शन मध्ये वाढ होईल असे आश्वासन विविध पत्रकात देण्यात आले होते पण एप्रिलमध्ये दिव्यांग व निराधार यांच्या पेन्शनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही दिव्यांग व निराधार यांची राज्य सरकार हे दिशाभूल व फसवणूक करत आहे असे प्रहार संघटनेचे जिल्हा निरीक्षक अशोक तनपुरे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये खंत व्यक्त केली