नाल्यांच्या साफसफाई साठी स्वच्छता अभियान राबवा:-सचिन खरात
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्ठिने नगर पालिका प्रशासनाने परतुर शहरात नाल्यांची साफसफाई करून जंतू नाशक फवारणी करुण घ्यावी सोबत घाणीची विल्लेवाट लावण्यासाठी शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी *शिवसंग्राम संघटनेने तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे*
शिवसंग्राम संघटनेने पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण शहरात वॉर्डासह मुख्य रस्तावर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर घाणीची विल्लेबाट लावणे आवश्यक आहे. जेणे करून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न उदभावणार नाही. मे महिना संपल्यानंतर मान्सून ची सुरुवात होणार आहे. आशा परिस्थितीत शहरातील नाल्यांची साफसफाई होणे ही तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा नेहमी प्रमाणे पहिल्या पावसातच नाल्यांचे पाणी रस्त्यावर येणार यात शंका नाही. वेळेत जर नाल्यांची साफसफाई केली तर पुढील मान्सून काळातील समस्यांचा सामना शहरवासियांना करावा लागणार नाही. मात्र नगर पालिका प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर थातूर मातूर स्वच्छता मोहीम राबविते. परिणामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे शहरवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने शहरातील घाणीची विल्लेवाट लावावी, शहरात जंतू नाशक फवारणी बरोबर मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई करावी यासाठी शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा आंदोलन करू अशी मागणी नगर पालिका प्रशासनाकडे शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात मनोज वटाने संदीप खवल अमुत राठी सखाराम माठे आदींनी केली आहे.