जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्याने जालना शहराचा विकास अधिक तीव्र गतीने होईल - आमदार लोणीकर, जालना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता ठराव पास

 
जालना प्रतिनिधी समाधान खरात 

जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत. याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या.
   यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथापुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अनेकदा भेटून पत्राद्वारे याबाबतीत विनंती केली होती. त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. आमदार बबनराव लोणीकर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याचा ठराव पास केला होता.
 त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे. राज्य शासनाच्या वतीने जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. दरम्यान आता या पाठपुराव्याला मोठं यश आल्याने जालना शहराच्या विकासात तीव्र गतीने वाढ होणार असून लवकरच जालना शहराचा कायापालट होईल. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने समाधान वाटत असल्याची भावना आमदार लोणीकर यांनी व्यक्त केली अशी माहिती आमदार लोणीकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेला पत्रका द्वारे केली आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....