तळणी येथे श्री संत नेमिनाथ महाराज याच्यां पूण्यतिथी निमित्य शिवमहापूराणाचे आयोजन
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
श्री . संत नेमिनाथ महाराज याच्यां पूण्यतिथी निमित्य शिवमहापूराणाचे आयोजन तळणी येथील प्रसिद्ध संत श्री नेमीनाथ महाराज याच्या ७० व्या पुण्यतिथी निमित्य उद्या वार मंगळवार पासून शिवमहापूराणाचे भव्य दिव्य नियोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकथाकार ह भ प महेश महाराज महाजन आळंदी देवाची याच्या रसाळ वाणीतून या शिवमहापूराणाचा प्रारंभ मिती वै कृ वार मगळवार रोजी होणार असुन सांगता मिती वै कृ मगळवार रोजी होणार आहे
पंचक्रोशीतील ग्रामस्थानी या सप्ताह मधील धार्मीक कार्यक्रमाचा व शिवप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हाहन श्री संत नेमीनाथ महाराज संस्थांन व ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे या सप्ताह मध्ये काकडा भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापूराण हरी किर्तन व . यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तळणी परीसरातील खटकेश्वर बाबा म्हणून श्री संत नेमीनाथ महाराज प्रसिध्द आहेत सप्ताहच्या निमीत्याने तळणी येथे सात दिवस मांस विक्री बंद असते सप्ताह च्या निमीत्याने लेकी बाळी आवर्जुन या भडार्यासाठी येतात गावातील कोणी बाहेरगावी असेल तर आवर्जुन या भडार्यासाठी गावी येतात तळणी येथे प्रथमच शिवमहापूराणाचे आयोजन केल्याने भावींकांची मोठी उपस्थीती असणार आहे या सप्ताहचे .व्यासपीठ चालक म्हणून ह भ प कैलास महाराज टिटवीकर याच्या नेतृत्वात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन व अन्य कार्यक्रमाचे नियोजन केले आहे सात दिवस या सप्ताह मध्ये ह भ प कैलास महाराज टिटवीकर ह भ प राम महाराज बनकर ह भ प महेश महाराज महाजन ह भ प गणेश महाराज ढगे पंढरपूर ह भ प बबन महाराज हाढीकर ह भ प कृष्णा महाराज रासवे चिकलठाणा ह भ प सुधाकर शास्त्री मुळे यांची कीर्तने होणार असून ह भ प सेवाधारी पौळ बाबा याच्या काल्र्याच्या किर्तनाने या सप्ताहची सांगता होणार आहे या सप्ताह साठी अर्जुन महाराज बादाड विष्णु महाराज बादाड शालीकराम टेकाळे दत्ताञय महाराज पवार जनार्धन सरकटे व वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थि व संस्थेचे पदाधीकारी व ग्रामस्थ परीश्रम घेत आहेत