बीड ते चौंडी बस सेवा सुरु समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा- प्रकाश सोनसळे
प्रतिनिधि समाधान खरात
बीड ते चौंडी बस सेवा सुरू झाली आहे या बस सेवेचे आज बीड स्थानकामध्ये पुष्पहार व नारळ फोडून पिवळा झेंडा दाखवून या बसचे उद्घाटन आज करण्यात आले.
ही बस सकाळी 09.30 च्या दरम्यान बीड स्थानकामध्ये लागणार आहे व ही बस 09.45 च्या सुमारास चौंडी कडे निघणार आहे .
बीड चौंडी बससेवचे उद्घाटन करताना धनगर समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश सोनसळे, धनगर समाज बीड जिल्हा प्रमुख भारत गाडे ,महानवर सर, दातीर सर, सानप साहेब, सुखदेव मंडलीक,लक्ष्मण बेवले, मुक्ताराम शेळके,शरद तायडे, भगवान मेंद,जय खरात, करण भोंडवे ,विशाल तांबे, डफाळ नवनाथ,गहिनीनाथ खरात,डिंगाबर खरात,नवनाथ लांडे,जयराज भोजने, आदींच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.