गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सिटी हॉस्पिटल कडून शालेय सहित्त्या चे वाटप.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ, तथा सिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ.सत्यानंद कराड व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.संध्याताई कराड यांच्या हस्ते पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वर्ग १० वी चे पुस्तकाचे संच वितरीत करण्यात आले आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की परतूर येथील प्रसिद्ध डॉक्टर तथा सिटी हॉस्पीटल चे संचालक सत्यानंद कराड हे दरवर्षी या शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट देतात कोणताही मुलगा पुस्तकामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये ,असे समाजात अनेक मुले आहेत की ते केवळ शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने शिकण्याची इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाही ही बाब लक्षात आली म्हणून आपण हे काम करत असल्याचे कराड म्हणाले. पुढे बोलतांना कराड यांनी सांगितले की समाजात असे अनेक दानसुर व्यक्तीआहेत कि ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करू शकतात त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
यावेळी श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डॉ.सत्यानंद कराड यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.या वेळी विद्यालयाचे शिक्षक आबासाहेब गाडेकर ,सी.एन.खवल , पांडुरंग डवरे,जी.प.चे शिक्षक श्री आढे सर , दवाखान्यातील कर्मचारी श्री शरद यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.