परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.



 
परतूर  प्रतिनिधी(कैलाश चव्हाण)
येथील साईबाबा मंदीराजवळील पेट्रोलपंपवर रात्री उभा केलेला कापसाने भरलेला अयशर ट्रक चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना दि २२ मे रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस घडली होती. या प्रकरणी परतूर पोलिसांनी अयशरसह आरोपीचा पोलिसांनी शोध लावून आरोपीच्या मुसक्या आवळून चोरी गेलेल्या मालाची रक्कम आरोपीकडून वसूल करून गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार पोलिसांनी जप्त केली आहे.  
 अयशरसह कापूस चोरी प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना अटक करतांना पोलिस नाईक अशोक गाढवे, शमवेल गायकवाड, अमोल गायकवाड आदि दिसत आहेत. ...
काकडे कंडारी येथील शेतकरी भगवान नामदेव काकडे यांनी दि २१ मे रोजी रोजी संध्याकाळी दहा वाजेच्या दरम्यान कापुस आयशर गाडी क्रमांक एमएच २० सीटी ३९९० मध्ये एकरुखा येथे भरुन आणलेला आयशर चालक समशेर खाँन पठाण यांनी कापसाने भरलेले आयशर हे साईबाबा मंदीराजवळ पेट्रोलपंपवर रात्री साडेदहा वाजता लावुन घरी गेलो होतो. सकाळी आयशर लावलेल्या ठिकाणी आला असता कापसाने भरलेले आयशर हे चोरीला गेल्याचे कळले. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या घटनेच्या तपासची सूत्रे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना अशोक गाढवे, शमवेल गायकवाड, अमोल गायकवाड, यांनी तपास करून अयशरचा मागोवा घेत. अयशरचे धागेदोरे हाती लागल्याने चाळीसगाव तालुक्यात सोलापूर - धुळे रोडवर दहिवद शिवारात चोरट्याने कापसाने भरलेला अयशर त्यातील कापसाची चोरी करून रिकामा ट्रक रस्त्याच्या कडेला सोडून दिला. पोलिसांनी यांचा शोध घेऊन दि २९ मे रोजी ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केला होता. अयशर मधील कापूस चोरट्यांनी विक्री करून फरार झालेले असतांना पोलिसांनी शोध घेऊन आरोपी दिपक शामराव लांडगे, वय २१ वर्ष रा. पांगरा ता.घनसावंगी, दिलीप महादु चौधरी वय ३८ वर्ष रा.कुंजर ता. चाळीसगाव, अनिल ईश्वर पाटील वय ३६ वर्ष रा.निपाणी ता.पाचोरा जि.जळगाव, ह.मु. चिकलठाणा औरंगाबाद यांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आली. त्याचे ताब्यातुन त्यांनी कापुस विक्री केलेले पाच लाख रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आले. पोलिसांना चोरी गेलेले अयशरसह कापूस विक्रीतून चोरट्यांना आलेली रक्कम जप्त केली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, पोलीस निरीक्षक एस.आर.कौटाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गाढवे, पोलीस अंमलदार शमुवेल गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांनी केली आहे. या कारवाईने परतूर पोलिसांची मान उंचावली आहे.  


Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....