जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरापर्यंत मोदीजींचे विचार पोहोचवा-युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणकर,परतुर येथून घरोघरी संपर्क अभियानाची राहुल लोणीकर यांच्या हस्ते सुरुवात
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नऊ वर्षे पूर्ण केलेले असून या नउवर्षाच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले जनसेवा व विकासात्मक कामाचा लेखाजोखा थेट घराघरापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांनी सादर करावा असे आवाहन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले
ते परतुर येथे महाजन संपर्क अभियानाच्या निमित्ताने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की बूथप्रमुखापासून शक्ती केंद्र विस्तारक शक्ती केंद्रप्रमुख जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पक्षाचे आजी माजी पदाधिकारी या सर्वांनी या अभियानात सहभाग घेऊन येत्या आठ दिवसांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून संपर्क करत नऊ वर्षाच्या काळात झालेली विकास कामे थेट जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वांगीण प्रगती होत असून दीनदलित पिढीचा पासून युवा युवाती पर्यंत, शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत मोदी सरकारने सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वच घटकांचा विचार केलेला असून त्यांनी देशांतर्गत राबवलेल्या प्रत्येक योजना या सर्व घटकांच्या हिताच्या असल्याचे सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांनी आपली वेगळी छाप जगात निर्माण केली असून जगभरामध्ये भारताने आपले वेगळे अस्तित्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध केले असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
महा जनसंपर्क अभियान थेट ग्रामपंचायत राबवत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देत घराघरापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
या वेळीयावेळी सतिशराव निर्वळ, रमेश भापकर, गणेशराव खवणे, माऊली शेजुळ, राजेश मोरे, परमेश्वर आकात, अशोक बरकुले, कैलास बोराडे जिजाबाई जाधव,माणिकराव वाघमारे, सुदाम प्रधान, प्रदीप ढवळे, नागेश घारे, विठ्ठलराव काळे, सुजित जोगस, शत्रुघ्न कणसे, संभाजी वारे, रवींद्र सोळंके, रंगनाथ येवले, संपत टकले, अविनाश राठोड, विक्रम उफाड, शेषणारायन दवणे, सुधाकर सातोणकर संदीप बाहेकर, कृष्णा आरगडे विलास घोडके, बाबाजी जाधव, सिद्धेश्वर केकान, माऊली गोंडगे सिद्धेश्वर सोळंके शिवाजी पाईकराव दिगंबर मुजमुले प्रदीप ढवळे, गजानन लोणीकर, नवनाथ खंदारे, विकास पालवे, नितीन सरकटे, गजानन उफाड, शेख नदीम, सिद्धेश्वर लहाने, कैलास चव्हाण, सुधाकर बेरगुडे, किशोर हनवते, जानकिराम चव्हाण, शिवाजीराव घनवट, मोहन आढे, रोहन आकात भगवान आरडे बंडू मानवतकर, रमेश चव्हाण गणेश सोळंके रमेश आढाव परमेश्वर केकान माऊली जईद सोनू अग्रवाल मुज्जू कायमखानी नरेश कांबळे मलिक कुरेशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती