अंनिसचे कार्यकर्ता संवाद - प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

जालना प्रतिनिधी समाधान खरात
शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्रअंनिसच्या जालना जिल्हा शाखेतर्फे नुकतेच नागसेन वाचनालय, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे नवीन कार्यकर्त्यांसाठी संवाद- प्रशिक्षण शिबिर अतिशय उत्साहात संपन्न झाले.
 शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डाॅ.बसवराज कोरे यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात प्रा.कोरे यांनी देवा धर्माच्या नावाने ठिकठिकाणी विविध प्रकारचे शोषण कसे होत असते आणि ते कसे थांबवायला हवे यावर प्रकाश टाकला. नवयुवांनी महाराष्ट्र अंनिसच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले. महाराष्ट्र अंनिसची पंचसूत्री व अंनिसची व्यापक वैचारिक भूमिका याबाबत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे सर यांनी सविस्तर मांडणी केली. चमत्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण कसे करावे,त्यामागील शास्रीय कारणमीमांसा कशी स्पष्ट करावी हे सांगून, कार्यकर्त्यांच्या सहभागाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे सादरीकरण संघटनेचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी करून दाखविले. कार्यकर्त्यांकडून सराव करून घेतला. त्याचबरोबर सर्प विज्ञान आणि सर्पाबद्दलच्या अंधश्रद्धा आणि त्यांचे निर्मूलन यावर शिबिरात रंगनाथ थोरात यांनी मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती या विषयावर लक्ष्मी नारायण आखात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघटना कशी चालते, संघटनेची शिस्त आणि कार्यपद्धती यावर डाॅ. दिपक बुकतरे,ज्ञानेश्वर उढाण यांनी मार्गदर्शन केले. जालना जिल्ह्यात महाराष्ट्र अंनिसचे काम विस्तारण्यासाठी विशेष अभियान शाळा महाविद्यालयातून राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष वैशाली सरदार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार 
 मा सुनील खरात (mcm न्युज चॅनल), बाबासाहेब डोंगरे (दिव्य मराठी), मा अच्युत मोरे( दै.तरुण भारत),विनोद काळे(बदलता महाराष्ट्र),मा.समाधान खरात (सा. चकमक),मा.संघपाल वाहुलकर(दै. आनंद नगरी),मा.विष्णू कदम(विश्व क्रांती मराठवाडा),मा. कृष्ण शहाणे(पुढारी), मा.आप्पासाहेब मरकड(प्रिंट मीडिया, जालना) ,व शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीनी साक्षी अंजाण (नीट उत्तीर्ण) यांचा सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला. 
      या प्रशिक्षण शिबिरात घनसावंगी, बाजी उंब्रज ,जालना शहर शाखांचे मिळून ऐंशी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये डाॅ. बालाजी मुंडे, मनिषा पाटील,राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. 
महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे यांनी शिबिर संयोजनात विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. संपूर्ण शिबिराचे। सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष राजू खिल्लारे तर आभार बाळासाहेब कठोरे यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रधान सचिव दिलीप शिखरे, सुशील कुमार शेळके, अॅड. मारूती वाडेकर, सिद्धेश्वर राऊत,किशोर भालेराव, .अॅड.राहूल बोबडे आदींनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....