पाटोदा येथे श्री समर्थ विद्यालयात नागपंचमी निमीत्त प्रदर्शन.
परतुर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ] श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात नागपंचमी चे निमित्ताने विवीध जातींच्या सर्पाचे छायाचित्राचे प्रदर्न आयोजीत करण्यात आले होते.
आपले प्रत्येक सण व ऊत्सव हे वैज्ञानिक दृष्ट्या परीपुर्ण आहेत. आपण त्या मागील कारण मिमांसा समजुन घेतली पाहीजे.
नागपंचमी चे दिवशी देशाभर नागदेवतेची पुजा करण्यात येते .
सापांबद्दल असलेले गैरसमज दुर व्हावेत या साठीच विद्यालयात चित्रमय माहीतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्रात आढळुन येणारे बहुतेक साप हे बिनविषारी आहेत. साप हा शेतकर्यांचा मित्र असुन सापांना शक्यतो ठार मारु नये.
विद्यालयाचे शिक्षक श्री चत्रभुज खवल यांनी प्रत्येक सापाची जात त्याचा आढळ ई. लक्षणे विद्यार्थ्यांना समजुन सांगितली.
मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी संकलीत केलेल्या माहीतीवर आधारीत या चित्रप्रदर्शनीला विद्यार्थ्यांनी खुप मोठा प्रतीसाद दिला.
साप चावल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार या वेळी समजुन सांगण्यात आले.
प्रदर्शन यशस्वीतासाठी विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंदांनी परीश्रम घेतले.