छत्रपती गणेश मंडळाच्या शिबीरात 35 जणांचे रक्तदान
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
जालना जिल्हात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गणेश उत्सव काळात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत परतूर शहरातील रेणुकानगर येथील छञपती गणेश मंडळाने सामाजिक बांधीलकी जपत रविवार 24 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्तिक बोराडे यांच्या पुढाकारातुन आयोजित रक्तदान शिबीराला उदंड प्रतिसाद देत तब्बल 35 गणेश भक्तांनी रक्तदान केले.तत्पुर्वी शिबीराचे उदघाटन डाॅ.सोमनाथ रेपे,डाॅ.योगेश कदम,डाॅ.हरिप्रसाद ढेरे,नगरसेवक राजेश भुजबळ,बाबुराव हिवाळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी माजी सैनिक सोपान धुमाळ,डाॅ.स्वप्निल मंञी,विजय बोराडे,रामचंद्र धुमाळ,नामदेव काकडे,राजेश मस्के,सोमनाथ पांगरकर,दत्ता सुरूंग,राहुल कदम,राधेशाम तापडिया,आबासाहेब काकडे,गणेश कातारे, पुरुषोत्तम जेथलिया,अनिकेत कोंडावार,कृष्णा कातारे,बाळु काकडे,भागवत घडे,महेश नळगे,गणेश जगताप,साहिल सकलेचा,सुरज वैष्णव,रितेश शहाणे,दत्ता माळवदे,सिध्देश्वर बिल्हारे,कृष्णा धुमाळ जालना येथील जनकल्याण रक्तपेढीचे डॉ,संदिप वाघमारे ,कृष्णा इंगळे, प्रविण दुर्गम,अभिजीत जोशी आदी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
रक्तदानामध्ये शतकाच्या उंबरठ्यावर असणारे डाॅ.राजगोपाल तापडिया यांचा यावेळी छञपती गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.