परतूर येथे 40 जणांवर वीज चोरी प्रकरणी धडक कारवाई

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   परतुर शहरात वीज चोरी करणाऱ्यांची शोध मोहीम सुरूच असून दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी परतुर शहरात महावितरणच्या पथकाने 40 जणांवर वीज चोरी प्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  थकबाकी वीज बिले न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केलेला असताना विजेच्या तारेवर आकडे टाकून वीज चोरी करताना परतुर शहरातील 40 जणांनी एकूण 45 हजार 248 युनिटची सात लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. वीज चोरी करणाऱ्या चाळीस जणांविरुद्ध परतुर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत सुधारणा विधेयक नुसार कलम 135 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, जालना मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय सरग, जालना विभाग दोन चे कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती, परतुर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहराचे सहाय्यक अभियंता विकास दरेकर व त्यांच्या पथकातील कर्मचारी गोविंद सिंग चंदेल, विशाल येंदे, संभाजी शिंदे, रामेश्वर भामट ,शेख नदीम, शेख सोहेल ,प्रकाश ताठे यांनी ही कार्यवाही केली
  वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच राहणार असल्याचे महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात