समर्थ विद्यालयाचे कुस्ती स्पर्धत यश.
परतुर. प्रतिनीधी कैलाश चव्हाण
तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत कुस्ती या खेळ प्रकारात पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
आज दि. पाच सप्टेबर रोजी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धे अंतर्गत परतुर येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यत आले होते. या स्पर्धेत चौदा आणि सतरा वर्ष वयोगटात विद्यालयाचे विद्यार्थी युवराज शिंदे व शेख रेहान या खेळाडुंनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत अजिंक्यपद पटकावले.
या दोन ही खेळाडुंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यशस्वी खेळाडुंचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.बबनरावजी लोणीकर साहेब , ऊपाध्यक्ष तुळशिदासजी खवल, मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर , क्रिडा शिक्षक भास्कर कुळकर्णी , सर्व शिक्षक बांधव , पालक श्री संभाजी शिंदे , शेख लाला व गावकर्यांनी अभिनंदन करुन कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.