मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी- लोणीकरांची महाराष्ट्र शासनाकडे मागणी,१५ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करावी लोणीकरांचे शेतकरी बांधवांना आवाहन,शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी विमा कंपनीच्या विरोधात हायकोर्टात जाऊ- लोणीकरांचा इशारा*




परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार आणि पिक विमा कंपन्या यांचे साटे लोटे होते पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना केवळ लुटण्याचे काम केले असून विद्यमान शिंदे- फडणवीस- पवार या महायुतीच्या सरकारने पिक विमा कंपन्यांची मुजोरी मोडीत काढली असून शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून ५० टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी अशी मागणी यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

वाटुर फाटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री राहुल लोणीकर अधिकारी श्रीमती प्रतिभा गोरे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रोडगे मंठा तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक जालना तहसीलदार श्रीमती छाया पवार गटविकास अधिकारी श्री गगनबोने यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री रोडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की आघाडी सरकारच्या काळात पिक विमा कंपन्या मालक आणि सरकार चोर झालं होतं अशा परिस्थितीत केवळ पिक विमा कंपन्यांना फायदेशीर अशा स्वरूपाची नियमावली बनवण्यात आली त्यामध्ये पीक विमा कंपन्यांचे ठरवतील तोच नियम अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पुरते लुबाडले होते.

मागील पंचवार्षिक मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण स्वतः सरकारकडे सरकारने स्वतःची पिक विमा कंपनी काढावी अशा प्रकारचा ठराव मांडला होता त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाची सहमती देखील मिळाली होती परंतु दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार कुरघोडीचे राजकारण करत अस्तित्वात आले आणि हा प्रस्ताव मागे पडला आता नव्याने पुन्हा एकदा सरकारने राज्य सरकारची पिक विमा कंपनी काढावी व त्या कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे देखील यावेळी श्री लोणीकर यांनी स्पष्ट केले.

पिकाची नुकसान झाले असल्याची माहिती सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकरी ऑनलाईन पद्धतीने कंपनीपर्यंत पोहोचविण्यास असमर्थ असल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून देखील त्याची माहिती कंपनी पर्यंत पोहोचत नाही त्यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन ई पिक पाहणी द्वारे पिकांचे नुकसान झाले असल्याची नोंद करणे, टोल फ्री क्रमांकावर फोन करून नुकसान झालेल्या पिकांची माहिती देणे, ई-मेल द्वारे पिक विमा कंपन्यांना पिकांची परिस्थिती कळवणे, त्याचप्रमाणे ऑफलाइन फॉर्म द्वारे देखील विमा कंपन्यापर्यंत आपल्या पिकांची झालेली नुकसानाची नोंद शेतकरी करू शकतात असे देखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

एक रुपयात पिक विमा भरून उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकार भरणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांना दिलासा देणारा असून त्याबद्दल आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदन केले त्याचप्रमाणे १५ सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणी करता येणार असून शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी जेणेकरून एकही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन उपस्थित शेतकरी बांधवांना केले तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पाहणे करता येत नसेल किंवा त्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल तर पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून देखील पिक विमा उपलब्ध करून दिला जाऊ शकतो असे सांगत पिक विमा कंपन्या जर शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांना विमा उपलब्ध करून देणार नसतील तर प्रसंगी पिक विमा कंपन्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात देखील जाऊ असा स्पष्ट इशारा देखील यावेळी लोणीकरांनी दिला.

यावेळी सतीशराव निर्वळ संदीप गोरे गणेशराव खवणे कैलासराव बोराडे नागेशराव घारे ज्ञानेश्वर शेजुळ शत्रुघ्न कणसे संभाजी वारे संपत टकले दिगंबर मुजमुले अशोक बरकुले प्रसादराव गडदे गणपतराव वारे विक्रम माने सुहासराव कांबळे गजानन देशमुख लक्ष्मणराव टेकाळे पंजाबराव बोराडे सिद्धेश्वर सोळंके पद्माकर कवडे मधुकर मोरे जानकीराम चव्हाण गजानन लोणीकर माधवसिंग जनकवार शुभम आहे राजेभाऊ नरवडे अमोल पवार विलास घोडके कैलास चव्हाण डिगांबर आवचार निवास देशमुख नवनाथ खंदारे बाबाराव थोरात बाळासाहेब चव्हाण सुभाष बागल लक्ष्मण बोराडे शरद मोरे अमोल मोरे श्रीराम राठोड बाबाजी जाधव रामकिसन बोडखे अशोक कालापहाड बबलू सातपुते नागेश ढवळे अमोल पवार उद्धव वायाळ सोपान वायाळ शरद पाटील हनुमान चिखले विश्वंभर शेळके सुधाकर बेरगुडे केशव खराबे कैलास खराबे प्रमोद बोराडे गोरख गाडगे बाळासाहेब हजारे गीताराम हजारे अमोल जोशी सुभाष चव्हाण आनंद जाधव डोईफोडे संदीप तनपुरे दत्ता खराबे पंकज राठोड बंडू मानवतकर यांच्यासह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....