पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात भाजपा युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न,पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात देशाची वाटचाल महासत्तेकडे - आमदार बबनराव लोणीकर


जालना/प्रतिनिधी समाधान खरात
पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत अवघ्या विश्वात देशाला आदराचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा आज वाढदिवस. त्यांनी देशाला खऱ्या अर्थाने जगभरात सन्मानाने उभे केले, सामान्य भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. या कर्तृत्ववान जागतिक नेत्यासाठी ‘जीवेत शरद: शतम्’ हीच भावना मनात दाटून आली आहे.
   मोदींना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक वेगवान होवो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! करतो असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करीत हिंदूराष्ट्रला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्यासाठी संकल्पबद्ध असलेले राष्ट्रनायक, सशक्त भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्म दीना निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा जालना तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी ह भ प रमेश महाराज वाघ वीरेंद्र धोका अशोक पवार नारायण पवार, प्रा नारायण बोराडे , प्रा अशोकराव देशमुख, प्रा दिगंबर खेडेकर, प्रा गरड सर रणजित मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप भाई हिवराळे,सुशील ढोले, जिल्हा चिटणीस अनिल चव्हाण, शहर महामंत्री विनोद दळवी, शहर उपाध्यक्ष जितू मुटकुळे, राहुल पळसपगार, सय्यद इम्रान , तालुका उपाध्यक्ष विजुराज पवार, ऍड किरण काकडे, ऍड सुनील काळे, पांडुरंग जरहाड पाटील, प्रवीण एकुंडे, वैभव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आज 47 तरुणांनी रक्तदान केले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात