पिंप्रूळा येथील पुकारलेले उपोषण नितीन जेथलियांच्या उपस्तिथीत सोडले आरक्षण मिळेपर्यन्त साखळी पद्धतीने अंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार
परतुर - प्रतिनीधी कैलाश चव्हाण
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी करत गेल्या चार दिवसापांसुन तालुक्यातील पिप्रुंळा येथे पांडुरंग गाडगे, नाना आवटे, नंदकिशोर आवटे या मराठा युवकांनी पुकारलेले अमरण उपोषण काँग्रेसचे युवानेते नितीनकुमार जेथलिया यांच्या हस्ते आज दिनांक 14 सप्टेबंर रोजी सोडण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट , आष्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक नरके साहेब, बाबुरावजी हिवाळे, शाकेर भाई यांची प्रमुख उपस्तीथी होती.
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासणानंतर सराटी अंतरवाली येथे आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पा.यांनी मागे घेण्याच्या निर्णयानंतर नितीनकुमार जेथलिया यांच्या मध्यस्तीने पिप्रुंळा येथील अन्नत्याग अंदोलन मागे घेत साखळी पद्धतीव्दारे अंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी नितीनकुमार जेथलिया यांनी म्हटले की उपोषण लक्ष वेधण्यासाठी असते हे खरे असले तरी स्वतःला त्रास देउन न्याय मागण्यापेक्षा लोकशाही पध्दतीने कडव्या अंदोलनातुन सरकारचे लक्ष वेधावे. तरूणानी आत्महत्या करू नये तर आपल्या न्याय हक्कासाठी जनआंदोलनातून आपला अधीकार मागावा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आरक्षणाबाबत अनेकांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला हे अत्यंत चुकीचे असुन यामुळे त्या संबधीत व्यक्तीचा परिवार उध्वस्त होतो. म्हणुन आजच्या तरूणांनी आत्महत्येचा विचार करू नये. सर्व मराठा समाज एकवटल्याने आता सरकारही बिधरले असुन मराठा आरक्षणाबाबत शासकीय पातळीवर हालचाली चालु झाल्या असल्याची माहिती मिळत असून कोणत्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सुुरवातीपासुनची काँग्रेस पक्षाची भुमिका असल्याचे ते म्हणाले. तरूणांनी लोकशाही पध्दतीने आपला न्याय मागावा व कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवु नये , शहनिशा करूण आपली पुढील भुमिका ठरवावी व कायदा हातात हेऊ नये असे आव्हान त्यांनी यावेळी केले. यावेळी मोठयासंखेने मराठा बांधवांची उपस्थिती होती.