जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विष्णू कदम यांना जाहीर
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शासनाच्या वतीने दिल्या जाणारा 2022/23 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जालना जिल्हा परिषदेच्या वतीने श्री विष्णू कदम यांना जाहीर झाला आहे शैक्षणिक आणि सामाजिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा परतूर यांच्या वतीने सदर निवड बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
या निवडीबद्दल माजी मंत्री तथा विद्यमान आमदार श्री बबनराव लोणीकर साहेब, युवा भाजपा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष बाबुरावजी पवार सर, परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष भगवान जायभाये, जिल्हाध्यक्ष मंगेश जैवळ, तालुका अध्यक्ष दिलीप मगर,जिल्हा नेते कल्याण बागल,विष्णू तोटे,रंगनाथ रोकडे,रामेश्वर हातकडके,विष्णुपंत ढवळे,प्रकाशकाका ढवळे व राम सोळंके यासह सर्व शिक्षक बांधवांकडून अभिनंदन होत आहे