समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे - ह भ प अविनाश महाराज भारती
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
हे मस्तक पायावर आहे पण ते कोणत्या संतांच्या पायावर आहे तर ते वारकरी संतांच्या पायावर आहे वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर खूप टीका आहे कारण समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे या भोदूं संतांच्या पायावर डोके ठेवायचे का? तर ते नाही मग ते फक्त वारकरी सप्रदायाच्या विचारावार आणि वारकरी आचारावर जो नथमस्तक होतो अशा संतांच्या डोक्यावरच ठेवून आपल्या जीवनाचा उध्दार करून घ्यायचा असे प्रतिपादन ह भ प अविनाश महाराज भारती यानी देवठाणा येथे केले श्री संत तुकोबाराय गणेश मडळाच्या वतीने सुरू असलेल्या या गणेशोत्सवाच्या निमीत्य सुरू असलेल्या या किर्तन महोत्सवात त्यानी हे चौथ्या दिवशीचे किर्तन पूष्प गुंफले
श्री संत नामदेवराय याच्या देवराज आले मंचकी बैसोनी भक्तासी दिले अभयदान या अभंगावर निरूपण केले स्मशानातील भाषणात बोलणार्याला जशी किमत नाही जो गेलाय त्याला ही किमंत नाही आणि ऐकणार्याला ही किमंत नाही कारण स्मशानातले कोणी ऐकत नाही फक्त जगाच्या पाठीवर असे एकमेव व्यासपीठ आहे जेथे बोलणार्याला ही किमत आहे त्यापेक्षा एकणार्याला त्या पेक्षा ही किमंत ते व्यासपीठ म्हणजे वारकरी सप्रदांयाचे व्यासपीठ त्या व्यासपीठावर प्रत्यक्षात पांडूरग परमात्माचा सहवास असतो त्या व्यासपीठावरून धर्माच्या उन्नतीचे विचार माडल्या जातात तेथे फक्त भक्तीचा जागर असतो आदरचा स्नेह असतो प्रेमाचा ओलावा असतो आणि भावनेचा आदर असतो ते व्यासपीठ म्हणजे किर्तनाचे समाजाच्या प्रत्येकाचे असते अशा व्यासपीठात तुम्ही आम्ही खेळी मेळी ने सहवासीत होणे गरजेचे आहे किर्तनाच्या व्यासपीठावर ज्याच्या सदर्भाने बोलायचे त्या देवाचे अस्तीत्व तेथेच असते गणेशोत्सवाच्या माध्यमातून इतर शो ठेवण्या पेक्षा किर्तनाचे आयोजन करणे . म्हणज खरोखर त्याच्या नावाची भक्ती होय
आज काल गणेशोत्सवाच्या माध्यमातुन विविध प्रकारचे अधार्मीक कार्यक्रमाचे आयोजन काही मंडळाकडून केल्या जाते ते चुकीचे आहे आधीच तरुण पिढीचा कल देव देव करण्याकरिता कमी असतो आणि त्यात पून्हा अशा असस्कृत कार्यक्रमानी त्यात भर पडते लोकमान्य टिळकांनी त्या काळात डोळ्यासमोर व एक उद्दीष्ठ ठेवून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली समाजाने संघटीत राहुन समाजाच्या समस्या सोडवाव्या आपापसातील वैर संपावे संघटीत राहून संकटांचा सामना करता यावा या उद्देशाने . सार्वजनीक गणेशोत्सवाची सुरवात टिळकांनी केली त्याच्या त्या उद्देशाची गरज आज पुन्हा समाजाला आहे गणेशोत्सवाच्या त्या काळात उत्सव साजरे करणे म्हणजे मोठा सघर्ष असायचा तरी सुध्दा लोक श्रध्येने उत्सव साजरे करायचे आताच्या काळात उत्सव साजरे करायला पूर्ण स्वातत्र्य असले तरी .त्या स्वातत्र्यात सस्कांराचा अभाव दिसुन येतो सण उत्सवातूनच आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन होत्त असते .सद्य स्थितीत मुलावर सस्कांर करण्याची गरज आहे ज्ञानोबा तुकोबाच्या या भूमीत आपले स्वःत अस्तीत्व कायम ठेवायचे असेल तर त्यानी दाखवलेला भक्ती मार्ग स्वीकारा तरच मनुष्य जन्माचा उद्धार होईल
संतानी स्वतः साधना करून सिद्ध केले आहे म्हणून ते संतपदाला प्राप्त झाले आहे . आज काल स्वंयघोषीत संतांचा सुकाळ झाला असून ते धर्मासाठी समाजासाठी घातकच आहे ते स्वःत स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला ग्रहीत धरून आपले खोटे अस्तीत्व निर्माण करतात समाजाने ते ओळखले पाहीजे खरे खोट ओळखण्याची द्रूष्टी समाजाला येण्यासाठी त्यानी संत सगतीची कास धरावीच लागेल संतांचा सहवासच मनुष्य जन्माचे सार्थक करणारा असतो . गरज आहे ती समाजाने त्याच्या जवळ जाण्याची आणि खरा संत ओळखण्याची खरा साधू खरा संत भौतिक सुखापासून नेहमी दुर असतो तो स्वःत चा कधीच विचार करत नाही तो समाजाचा विचार करतो अशा संतांच्या सहवासात राहून स्वःतचा व समाजाचा उध्दार करुन घेणे हे मनुष्याच्या हातात आहे संसारीक आयुष्यातील कमतरता देवाची भक्ती केल्याने कमी होतात त्या साठी मनाभावातून त्याला आळवण्याची गरज असल्याचे प्रतिपादान ह भ प अविनाश महाराज भारती यानी केले