मंठा तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
मंठा प्रतिनिधी रवी पाटील
क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2023 मध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये मंठा तालुक्यातील खेळाडू जिल्हा, विभाग, राज्य, व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकत असून खऱ्या अर्थाने मंठा तालुका खेळामध्ये आपली कात टाकून वेगळी ओळख निर्माण करत आहे यावर्षी स्वामी विवेकानंद विद्यालय मंठा येथील खेळाडू वैभव प्रकाश वाव्हूळे याने बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळून विभागात विभागीय स्पर्ध साठी पात्र झाला आहे तर जि प प्रशाला तळणी येथील श्रावण पांडुरंग जनकवार कुस्तीमध्ये 65 किलो वजनी गटात विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रमांक मिळून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता त्याचबरोबर विश्वनाथ विद्यालय तळणी येथील खेळाडूने कुस्तीमध्ये 80 किलो वजनी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे
वरील तिन्ही खेळाडू यांचे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व उपजिल्हाधिकारी डॉक्टर शशिकांत हातगल यांनी सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका क्रीडा अधिकारी डॉक्टर रेखा परदेशी मंठा तालुका क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ, अतिश खंडागळे, शिवानंद जायभाये, प्रकाश वाव्हूळे यांच्यासह पालक उपस्थित होते
खरंतर मंठा तालुक्यातील ही सर्व खेळाडू ग्रामीण भागातील असून मंठा तालुक्यातील क्रीडा क्षेत्रासाठी ही बाब अतिशय आनंदाची व अभिमानाची आहे व इतर खेळाडू व विद्यार्थ्यांनी याच्यातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपल्या आई वडिलांचे, शाळेचे, व मंठा तालुक्याचे नाव येत्या काळामध्ये उंचवावे व सशक्त समाज व देश घडवावा
मंठा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर व क्रीडा अधिकारी डॉक्टर रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा तालुका क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ आयोजित करत असून तालुक्यातील विविध शाळा सहभागी होत असून मंठा तालुक्याची क्रीडा नगरी म्हणून ओळख निर्माण होत आहे
सदरली यशस्वी खेळाडू यांना गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके, विस्ताराधिकारी सतीश शिंदे,गट समन्वयक के जी राठोड, सर्व केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी कार्यालय मंठा यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या
त्याचबरोबर मंठा तालुकास्तरीय कबड्डी खो-खो व मैदानी स्पर्धा येत्या काळामध्ये होणार असून यामध्ये सुद्धा घवघवीत यश संपादन करून मंठा तालुक्याचे क्रीडा क्षेत्रामध्ये नाव उंचावून तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण खेळाडू करतील अशी अपेक्षा गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांनी व्यक्त केली