परतुर येथे सकल धनगर समाजाचे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी एक दिवशीय जागरण गोंधळ आंदोलन..
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत वेळ काढून पणा करत दिशाभूल करणाऱ्या सत्ताधारी मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा निर्धार सकल धनगर समाजाने परतुर येथे सरकारला जागरण गोंधळ घालून केला आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणी सह तसेच चौंडी येथे उपोषणास बसलेल्या उपोषण कर्त यांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने परतुर येथे रेल्वे स्टेशन ते उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रमाता ,राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे झेंडे व प्रतिमा हातात घेऊन तरुणांनी एकच जल्लोष केला होता आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे असा सूर काढत शासनाच्या विरोधातही तरुणांनी घोषणा दिल्या तसेच आंदोलकाच्या हातामध्ये पिवळ्या पताका व गळ्यात पिवळा रुमाल व खांद्यावर घोंगडी असा देखावा मोर्चामध्ये करण्यात आला होता. येळकोट येळकोट जय मल्हार राजे यशवंतराव होळकर, राजे मल्हारराव होळकर यांचा जयघोष करण्यात आला आणि राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी या मोर्चाच्या वतीने करण्यात आली. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आला आणि त्या ठिकाणी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन भंडारा उधळून सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्यात आला.
सकल धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी रस्त्यावर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून वाहतूक काही काळ थांबली होती. परतूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परतुर उपविभागीय अधिकारी यांनी धनगर समाजाच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. सकल धनगर समाज समन्वय समितीच्या प्रतिक्रिया..
राज्य सरकार धनगर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे मात्र मुख्यमंत्री कोण करायचे हे धनगर समाजच ठरवतो धनगर समाजाला फडणवीस यांनी फसवले तर त्यांचे मुख्यमंत्री पद गेले त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले .त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रश्न मार्गी न लावल्यास माजी होण्यास वेळ लागणार नाही.
हनुमंत तुकाराम दवंडे सकल धनगर समाज समन्वयक
==========.....========
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगरांना एसटी आरक्षणाची नोंद घटनेत करून ठेवली आहे. तुम्ही आम्ही केली नाही मग आरक्षण नाकारण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्नच नाही.
रंगनाथराव येवले.. सकल धनगर समाज समन्वयक
====================
एसटी आरक्षण अंमलबजावणी करणार नाहीत तर भाजपला 2024 मध्ये मतदान नाही धनगर समाज येणाऱ्या निवडणुकात मतदान करणार नाही हे लक्षात असू द्या .
शिवाजी भालेकर सकल धनगर समाज समन्वयक
====================
सन 2014 मध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हणून म्हणून घोषणा केली. परंतु त्यांनी केलेली घोषणा ते विसरले आता नवीन घोषणा करत आहे 50 दिवसात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडू परंतु यासोबतच ते करायला विसरले नाही की आदिवासी समाजाला विरोध करायला सुरुवात करा.
बाबुराव गोसावी.. सकल धनगर समाज समन्वयक