अँड.किशनराव अंभुरे यांचे निधन
परतूर: प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येथील वैद्यकीय अधिकारी तथा सोमेश्वर बाल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर प्रशांत अंभुरे व प्रकीर्ण अंभुरे यांचे वडील एडवोकेट किशनराव आप्पासाहेब अंभुरे यांचे शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुखद निधन झाले ते 79 वर्षाचे होते किशनराव अंभुरे हे खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन होते. त्यांच्या काळात खरेदी विक्री संघाचा भरभराट झाला होता त्यांच्या कार्यकाळाची आजही आठवण करण्यात येते, माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनदादा लोणीकर यांचे ते मेहुणे होते.
छत्रपती संभाजीनगर येथे अल्प आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंड, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव श्रीष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गणमान्य व्यक्तींसह, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, कामगार वर्ग व त्यांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.