शत्रुघ्न कणसे यांची भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्षपदी निवड
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टीचे सभापती शत्रुघ्न कणसे यांची भाजपा तालुकाध्यक्ष पद्दी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या उपस्थितीत वाटुर तालुका परतुर येथे संपन्न झालेल्या बैठकीत नीवड करण्यात आली
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे यांनी केलेले काम अतिशय चांगले असून पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना लोणीकर यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की, संघटनेचे काम करत असताना कणसे यांनी केलेले काम अतिशय उत्तम असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे
तालुकाध्यक्ष म्हणून निश्चितच शत्रुघन कणसे कम करतील अशी अपेक्षा यावेळी आमदार लोणीकर यांनी व्यक्त केले