समर्थ विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन.

परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ]. ता.परतुर. येथील श्रीसमर्थ माध्यमिक विद्यालयात वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या पाल्याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष देवुन त्यांच्या ऊज्वल भविष्यासाठी शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी केले.
     पुढे बोलतांना ते म्हणाले की , प्रत्येक विद्यार्थी हा कुटूंबाचे व राष्ट्राचे भविष्य घडवत असतो. कष्टाने व जिद्दीने अभ्यास करुन प्रत्येक परीक्षेत यश संपादन करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते.
 मोबाईल - दुरचित्रवाहीण्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधे मोठा अडथळा निर्माण करीत आहेत म्हणुन पालकांनी आपल्या पाल्यास गरज असल्यासच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी असे आवाहन केले.
आपल्या शाळेत शिकणारी सर्वच विद्यार्थी हे कष्टकरी शेतकर्यांची आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमधे खुप मोठी ऊर्जा असते त्या ऊर्जेला सकारात्मकतेकडे घेवुन जाण्याची प्रेरणा शाळेतुन शिक्षक मंडळी देत असतात. पलकांनिही वेळोवेळी शाळेत भेट देवुन आपल्या पाल्याची प्रगती तपासुन घेण्याचे आवाहन करण्यात आले.
भारतमातेच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील शिक्षणप्रेमी नागरीक व पालक श्री नारायणराव खवल हे होते.
 प्रास्ताविक श्री ऊध्दव खवल तर सुत्रसंचालन श्री रोकडे पाराजी यांनी केले. श्री विद्यानंद सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मोठ्यासंख्येने पालक ऊपस्थीत होते. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतिसाठी शिक्षकांशी सुसंवाद साधला.
यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.समर्थ विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन. 
-----------------------------------

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....