रेल्वे स्टेशन परतुर येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा ...
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन 67 वर्षे पूर्ण झाले त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व नागरिक आज रेल्वे स्टेशन परिसरात पंचशील ध्वजाजवळ एकत्र जमा झाले होत
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर झूंगाराम साळवे व प्रकाश वेडेकर यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले त्यानंतर रेल्वे स्टेशन मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस रेल्वे स्टेशन अधीक्षक अमरदीप व सीनियर बुकिंग क्लार्क संजय गाडगे यांनी पुष्पहार अर्पण केला, आपल्या मनोगतात रेल्वे स्टेशन अधीक्षक अमरदीप यांनी म्हटले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी या पदापर्यंत पोहोचलो आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर खूप उपकार आहेत, यावेळी सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता . यावेळी प्रदीप साळवे, लिंबाजी कदम, प्रशांत साळवे, विकास वेडेकर, प्रशांत वेडेकर,पत्रकार अशोक ठोके,दीपक हिवाळे, नितीन खरात,विजय ससाळे, बाळू लाटे, विकास उमप,रवी इंगळे, कुमार लांडगे, अभिषेक कुलकर्णी उपस्थित.