मोठी स्वप्ने पहा आणि परिश्रम करून पूर्ण करा '- पोलीस निरीक्षक एम . टी. सुरवसे .
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आनंद इंग्लिश स्कूल परतुर येथे विद्यार्थी प्रतिकृती प्रदर्शन संपन्न झाले. याचे उदघाटन पोलीस निरीक्षक मा.एम.टी. सुरवसे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स मनोहर खालापुरे व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मा.सुरवसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लहान वयातच मोठी स्वप्ने पहावीत , मोठे झाल्यावर काय व्हायचे ते आत्ताच निश्चित करून परिश्रम सुरू करावेत. निश्चित यशस्वी व्हाल .
प्रमुख पाहुणे मनोहर खालापुरे यांनी शाळेत मिळत गुणवत्तापूर्ण शिक्षण व इतर उपक्रमा मुळे शाळेचे मोठे नाव झाल्याचे सांगितले. भविष्यातील अनेक यशस्वी विद्यार्थी शाळेतून घडविल्या जातील. प्रदर्शना च्या आयोजन बद्दल शिक्षक व पालक यांचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी संस्थेद्वारे सुरू झालेल्या ज्युनिअर कॉलेज ची माहिती दिली. स्वतःच्या हातांनी केलेली कृती विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहते त्यामुळे पालकांची विद्यार्थ्यांना कृती करण्यास वाव द्यावा असे सांगितले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सकस आहार, खडकांचे प्रकार, चंद्रयान मोहीम, वायूंची निर्मिती, इंग्रजी वाक्याची रचना व गणित विषयातील संकल्पना या विषयावर प्रतिकृती सादर केल्या.
प्रदर्शन पाहण्या साठी पालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नारायण सागुते यांनी केले तर प्रदर्शनाचा उद्देश सत्यशीला तौर यांनी सांगितला . सुत्रसंचलन रमेश लुलेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपाली हरजुळे यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.