सील्लोड तहसील येथील पेशकर वीकास तुपारे यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले
जालना प्रतीनीधी समधान खरात
सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून (पेशकर) वीकास तुपारे यांना वाळूचे ट्रॅक्टर सोडण्या करीता वीस हज्जाराची लाच स्वीकारताना रंगहाथे पकडले
सील्लोड येथील तक्रारदार यांचे दि.२७ ऑक्टोबर रोजी वाळू वाहतूक करताना टॅक्टर तलाठी जाधव यांनी पकडून तहसील त्याचा अहवाल तहसील कार्यालय सिल्लोड येथे सादर केले होते या अहवाला वर कार्यवाही होऊ नये या करीता सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून (पेशकर) यांनी तक्रारदार यांना सत्तर हजार रू लाच स्वरूपात तहसीलदार यांच्या साठी चाळीस हजार तलाठी यांच्या साठी वीस हजार व स्वता साठी दहा हजार आसे एकूण सत्तर हजाराची मागणी केली तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नव्हती तक्रारदार यांनी त्या वेळेस तीस हजार रु दिले व उर्वरित नंतर देण्याचे ठरले
ठरल्या प्रमाणे वीकास तुपारे यांनी राहीलेले चाळीस हजार रु घेऊन दि ३० ऑक्टोबर रोजी बोलवीले
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्या मुळे त्यांनी लाचलूयपत प्रतीबंधक वीभाग येथे संपर्क साधून तक्रार दिली
सदर तक्रारीवरून दि ३०आक्टोबर रोजी तडजोडी अंत २० हजाराची पंचासमक्ष लाच स्वीकारताना सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून वीकास तुपारे यांना आंबेडकर चौक सिल्लोड जि छत्रपती संभाजी नगर येथे रंगेहाथ पकडण्यात आले
ही कार्यवाही संदिप आटोळे पोलीस अधिक्षक लाचलूपत प्रतिबधक वीभाग छत्रपती संभाजी नगर,किरण बीडवे उप अधीक्षक लाचलूपत प्रतिबधक वीभाग जालना यांच्या मार्गदर्शनखाली शंकर मुटेकर पोलीस अधीक्षक लाचलूपत प्रतिबधक वीभाग जालना, गजानन कांबळे, गजानन खरात,गणेश बुनाडे, चालक भालचंद्र बीनोरकर यांनी केली