सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट......मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी,परतूर येथे मोर्चा.....
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेषित मोहम्मद तसेच अल्लाह यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर लीहल्याने शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी समाजाच्या वतीनेपोलीस प्रशासना व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात दिनांक 05 ऑक्टोंबर रोजी गणराज नाईक पाटील या युवकाने स्वतच्या मोबाईल वरून मुस्लिम समाजाचे प्रेषित मुहम्मद पैगंबर,अल्लाह व हजरत फातेमा यांच्या विरोधात अश्लील व अपमान जनक पोस्ट करून सोशल मीडियावर प्रसारित केली आहे यामुळे देशातील सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून तसेच हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवून आणण्याचा हेतू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे तसेच या कृत्या मागे कोणाचे षडयंत्र आहे याची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
तत्पूरवी शहरातील मलांगशाह चौकातून मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारो मुस्लिम समाजासह इतर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते मोर्चा दरम्यान पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.