अग्रवाल सेवा समितीच्या अध्यक्ष पदी बगडिया तर उपाध्यक्ष्य पदी भारूका
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी श्री महाराजा अग्रसेनजी ची जयंती साजरी करण्या साठी परतूर अग्रवाल समाजाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली..
त्या मध्ये अध्यक्ष सौरभ बगडिया उपाध्यक्ष शरद भारूका कोषाध्यक्ष मुकेश केजडीवाल सचिव आनंद बगडिया सहसचिव प्रणव मोर यांची नियुक्ती करण्यात आली.
ह्या वर्षी जयंती धुमधडक्यात साजरी करण्याचे योजिले आहे तसेच ह्या वर्षी परतूर वाटूर रोड वर शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयन्ताने उभारण्यात आलेल्या अग्रसेन स्तंभा चे उदघाटन सुद्धा करण्याचे ठरविण्यात आले आहे.