अपघाती विमा योजना धावपळीच्या युगात कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज -- मुख्य प्रबंधक अतुल सावजी.,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून वारसाना दोन लाख रुपये विमा मंजूर
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याचे जीवन अनमोल असतांना आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षासाठी कुटुंबाला संरक्षणसाठी अपघाती विमा ही काळजी गरज आहे. प्रत्येकाने आपला विमा काढून घ्यावा असे आवाहन स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले. ते प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून वारसाना दोन लाख रुपये विमा मजूर झाल्यानंतर धनादेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी एसबीआय बँकेचे उपप्रबंधक मनोहर गावडे, सेवा व्यवस्थापक इम्रान पठाण, प्रवीण दुधाट, अमित राहंदले, अभिषेक वैष्णव, भारत सवने यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य प्रबंधक अतुल सावजी बोलताना म्हणाले की केंद्र शासनाच्या विमा योजनेत भारतीय स्टेट बँकेच्या प्रत्येक ग्राहकाने स्वत काळाची गरज ओळखून विमा घेणे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा वीमा योजनांमध्ये अतिशय अल्प दरात वीमा काढून आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे. तसेच उतरत्या वयाच्या काळात शासनाची अटल पेन्शन पाच हजार रुपये पर्यंत दरमहा पेन्शन योजनात सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी श्री अतुल सावजी यांनी केले. परतूर ये...