संघ' संस्थेच्या वतीने गरजू महिलांना दिवाळी भेट किराणा सामानाची कीट वाटप ; संस्थेचा सामाजिक उपक्रमाने शुभारंभ
'
जालना प्रतिनिधी समाधान खारात
'सोसायटी फॉर सोशल,अँग्रीकल्चरल,नॅचरल ग्रोथ अँड हेल्थ' अर्थात 'संघ' ( SANGH ) या सेवाभावी संस्थेच्या शुभारंभानिमित्त गरजू महिलांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा कीट वाटप करण्यात आल्या. सिरसवाडी ( ता.जालना) येथे हा उपक्रम नुकताच घेण्यात आला.
यावेळी जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध 'कार्ड' संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, 'दैनिक बदलता महाराष्ट्र'चे कार्यकारी संपादक विनोद काळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
'संघ' संस्थेचे अध्यक्ष संघपाल वाहूळकर,सचिव वंदना
वाहूळकर, सोमनाथ खळेकर,गजानन गाढे,अमोल लिहीनार,सुयोग कुलकर्णी यांनी ही सेवाभावी संस्था स्थापन केली असून कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थेचा सामाजिक उपक्रम राबवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी श्री. तायडे, पत्रकार विनोद काळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी गावातील गरजू महिलांची उपस्थिती होती.