अपघाती विमा योजना धावपळीच्या युगात कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज -- मुख्य प्रबंधक अतुल सावजी.,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून वारसाना दोन लाख रुपये विमा मंजूर
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याचे जीवन अनमोल असतांना आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षासाठी कुटुंबाला संरक्षणसाठी अपघाती विमा ही काळजी गरज आहे. प्रत्येकाने आपला विमा काढून घ्यावा असे आवाहन स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले.
ते प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून वारसाना दोन लाख रुपये विमा मजूर झाल्यानंतर धनादेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी एसबीआय बँकेचे उपप्रबंधक मनोहर गावडे, सेवा व्यवस्थापक इम्रान पठाण, प्रवीण दुधाट, अमित राहंदले, अभिषेक वैष्णव, भारत सवने यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य प्रबंधक अतुल सावजी बोलताना म्हणाले की केंद्र शासनाच्या विमा योजनेत भारतीय स्टेट बँकेच्या प्रत्येक ग्राहकाने स्वत काळाची गरज ओळखून विमा घेणे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा वीमा योजनांमध्ये अतिशय अल्प दरात वीमा काढून आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे. तसेच उतरत्या वयाच्या काळात शासनाची अटल पेन्शन पाच हजार रुपये पर्यंत दरमहा पेन्शन योजनात सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी श्री अतुल सावजी यांनी केले.
परतूर येथील पत्रकार कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा ऑगस्ट महिन्यात निधन झाले. त्यांचा परतूर व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या पुढाकारातून भारतीय स्टेट बँकचा प्रधानमंत्री सुरक्षा, व प्रधानमंत्री जीवन ज्योति सुरक्षा विमा योजनेत विमा उतरविला होता. अचानक त्यांच्यावर ऑगस्ट महिन्यात काळाचा आघात झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी परतूर व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भारत सवने यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करीत मयत कृष्णा धोंगडे यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेतून चार लाख रुपये मिळणार आहे. त्यापैकि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून दोन लाख रुपये प्राप्त झाले आहे. त्याचा धनादेश स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांच्या हस्ते मंगळवारी वितरित करण्यात आला. यावेळी एसबीआय बँकेचे कर्मचारी ग्राहक उपस्थित होते.