मा बागेश्वरी च्या दहाव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ.
परतूर. प्रतिनिधी कैलाश चव्हाण
मा बागेश्वरी साखर कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दिनांक ६ रोज सोमवारी कारखान्याचे जनरल मॅनेजर रमेश निर्वळ यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. मा बागेश्वरी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये ४ लाख ४१ हजार ३३६.१२७ मे. टन उसाचे गाळप करून साखर पोती उत्पादन ५०२११० क्विंटल होऊन सरासरी साखर उतारा ११.३७ एवढा राहिला याप्रमाणे येणारा निव्वळ एफ आर पी दर रुपये २६७८.४० पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून जाहीर केल्याप्रमाणे कारखान्याने उद्दिष्ट पूर्ण केले. मागील दहा वर्षापासून साखर कारखान्याचे सर्व गळीत हंगाम यशस्वी पणे पूर्ण करून ऊसाला चांगला भाव देण्यात आला आहे. या चालू हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन पहिली उचल २२०० रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. त्यानंतर बैलपोळा सणासाठी दुसरा हप्ता व दीपावली पूर्वी तिसरा हप्ता निघालेल्या एफ आर पी प्रमाणे दर शेतकऱ्यांना देण्यात येईल मागील गळीत हंगाम २०२२- ३३ पेक्षाही यावर्षीचा गळीत हंगाम २०२३- २४ साठी एफ आर पी दर अंदाजे निश्चितच चांगला राहील. कारखान्याने यावर्षी ५ लाख मे. टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून या हंगामात फेब्रुवारी पर्यंत नोंदीचा ऊस गाळपास आणला जाईल त्यानंतर कारखाना परिसरातील बिगर नोंदीचा सर्वच ऊस गाळपास आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस जाण्याविषयी चिंता करू नये. या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस मा बागेश्वरी साखर कारखान्यास द्यावा असे आव्हान जनरल मॅनेजर रमेश निर्वळ यांनी यावेळी केले. गळीत हंगाम २०२३- २४ चा शुभारंभ सर्वप्रथम बॉयलरचे प्रदीपन सुंदरराव देशमुख यांच्या हस्ते करून, गव्हाण, वजन काट्याची विधिवत पूजा करून कारखान्याचे जनरल मॅनेजर रमेश निर्वळ यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. यावेळी जनरल मॅनेजर बळवंत पाटील, मुख्य शेतकरी पी. टी. खंदारे, संतोष दिंडे, एम नवनळे, मुख्य अभियंता गजानन जाधव, चीफ केमिस्ट बी. बी. जाधव, ज्ञानेश्वर देशमुख, राहुल माने, खाजा पटेल, हनुमंत मुगळे, सुरक्षा अधिकारी दिनकर लीपणे, मनोहर केंद्रे, विठ्ठल बागल सह ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते. चौकट. भविष्यात एकाही शेतकऱ्याचा ऊस गळपविना राहणार नाही- चेअरमन जाधव. यावेळी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की भविष्यात एकाही शेतकऱ्याचा ऊस गळापविना राहणार नाही, अत्यंत अडचणीच्या काळातही कारखाना परिसरातील शेतकऱ्यांचे उसाचे टिपरूही कारखान्याने शिल्लक ठेवले नाही. पावसाळा सुरू झाल्यावरही कारखाना चालू ठेवून शेतकऱ्यांच्या उसाचे मागील काळात गाळप केले आहे. त्यामुळे भविष्यातही शेतकऱ्यांनी ऊस जाण्याची चिंता करू नये. पाण्याचे नियोजन करून उसाचे क्षेत्र वाढवावे सर्व उसाच्या नोंदी घेतल्या जातील व उतसही वेळेवर नेला जाईल. शेतकऱ्यांनी मात्र आपल्या कारखान्याचे हित लक्षात घेऊन आपला ऊस बागेश्वरी कारखान्यासच घालावा असेही आवाहन शेवटी चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केले. फोटो. मा बागेश्वरी साखर कारखान्याचा कवाली टाकून शुभारंभ करताना जनरल मॅनेजर रमेश निर्वळ सुंदरराव देशमुख बळवंत पाटील पिटी खंदारे गजानन जाधव आदी.