राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी शिवाजी भालेकर यांची नियुक्ती.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभागाच्या "प्रदेश सचिव" पदी श्री शिवाजी भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आहे . नियुक्ती पत्र आ.रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आले.
शिवाजी भालेकर हे पक्ष बळकटीसाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षांची ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवत असतात. आणि त्यांचा या पक्षावरील बांधिलकी व कटूब्ध विश्र्वास पाहता त्यांना हे पद देण्यात आले आहे. तसेच त्यांनी पक्ष वाढीसाठी व पक्षाला बळकटी आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करावेत असे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.