परतुर येथे श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा आयोजनाची रविवारी बैठक
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी आयोजनाची बैठक परतूर येथे रविवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य श्रीराम जन्मभुमी मंदिर पुर्णत्वाकडे जात आहे. दि 22 जानेवारी 2024 मध्ये ते पुर्ण होवुन रामलल्लाची मुर्ती त्याठिकाणी विराजमान होणार आहे. हा सर्वच हिंदुसाठी आनंदाचा क्षण आहे. तसेच परकीय आक्रमण परतवुन हिंदुचा सार्वभौम राजा म्हणुन छत्रपती शिवरायाचा "शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या घटनेस 6 जुन 2024 रोजी 350 वर्ष पुर्ण होत आहे. या आनंदाच्या क्षणाचा आनंदोत्सव कसा साजरा करायचा याबाबत प्रत्येक हिंदु बांधवापर्यंत श्रीराम जन्मभुमी निर्माण न्यास समितीतर्फ देण्यास आलेल्या अक्षता पोहचविण्याच काम स्वयंसेवक करणार आहेत. दोन्ही आनंदमयी क्षणात जास्तीत जास्त हिंदुबांधवाचा सहभागी व्हावे. यासाठी तालुक्यातील स्वयंसेवक, बजरंगी, हिंदुत्ववादी संलग्न संघटना यांची व्यापक बैठक दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रविवार वेळ दुपारी 3 वाजता इंदिरा मंगल कार्यालय, येथे आयोजित करण्यात आली. जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.