कोल्हापूरी बंधाऱ्याचे रूपांतर उच्च पातळी बंधाऱ्यात करण्यासाठी तळणी येथे दि.३० नोव्ह. रोजी रास्ता रोको

तळणी : . प्रतिनिधी ( रवि पाटील )
तळणी परीसराची जीवनदाईनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्णा नदीपात्रावरील कोल्हापूरी बंधार्याचे उच्च पातळी बंधार्‍यात रुपांतर करण्यासाठी तळणी येथे किशोर खंदारे याच्या नेतृत्वाखाली दि ३० नोव्हबर गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पूर्णा नदी पाञातील वाघाळा इंचा व देवठाणा उस्वद या तीन ठिकाणचे कोल्हापूरी बंधाऱ्यचा बाजूचा भराव आतिवृष्टीत वाहून गेला आहे यामुळे या बंधार्यात एक थेबं सुध्दा पाणी अडवल्या जात नाही या तिनही ठिकाणची हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येऊ शकते उस्वद देवठाणा येथील बंधार्याचे दोन वेळा दुरुस्तीचे काम केले तरी परीस्थीती जैसे थै आहे

वाघाळा पूर्णा पाटी (ईचा ) व देवठाणा येथील कोल्हापूरी बंधार्याच्या बाजूच्या शेतकर्याच्या जमीनी पूर्ण पूणे खरडून गेल्या आहेत या बंधार्यामुळे उस्वद देवठाणा कानडी तळणी हानवतखेडा लिबंखेडा ईचा सासखेडा टाकळखोपा वाघाळा दुधा किर्ला या बारा गावांना या बंधार्याचा फायदा होईल वाघाळा येथील बंधारा हा पंधरा वर्षापासुन नांदुरुस्त आहे पूर्णा पाटी ईचा येथील बंधारा चार पाच वर्षापासून तर देवठाणा उस्वद येथील बंधारा गेल्या दहा बारा वर्षाच्या अधिकच्या कालावधी पेक्षा नादुरूस्त आहे , हे बंधारे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी जनावारासाठी व शेतकर्याच्या प्रगतीसाठी वरदान ठरू शकते या साठी या बंधार्याची नव्याने बाधणी करणे गरजेचे आहे कधी काळी या मतदार संघाला एकाच वेळी तीन तीन आमदारांनी प्रतीनीधीत्व केले तरी सुध्दा शेतकर्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले कसे ?

या तीनही बंधार्याचे रुपातर उच्च पातळी बंधार्यात झाले तर या परीसरातील शेतकर्याना विदर्भातील धरणातील पाणी सोडण्याची वाट पाहावी लागणार नाही या प्रत्येक बंधार्या खाली (तीनशे हेक्टर च्या समोरच जमीन ओलीताखाली येते बंधार्यात पाणी राहील्यास आजु बाजुच्या विहीरीची पाणीत कमालीची वाढ होते हा शेतकर्याचा अनुभव आहे 
    या बंधार्याचे काम शासनाकडून झाले तर पूर्णा नदी पात्रातील सर्व ठिकाणचे अवैध वाळू उत्खनन बंद होऊ शकते ? पूर्णा नदी पाञात पाण्याची उपलब्धता असल्यावर वाळू काढणे शक्य नाही सध्या तळणी परिसर दुष्काळाच्या व पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे ओसाड असलेल्या या परीसराला पूर्णा नदीचे पाञ नव सजिवणी देऊ शकते म्हणुनच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किशोर खंदारे याच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे नियोजन केले आहे,. 
   या बंधार्याचे नव्याने काम होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी व संबंधीत अधिकार्याना निवेदन दिले आहे

मागच्या अधिवेशनात या तीनही बंधार्यासंबधात पृश्न उपस्थीत केला होता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या कडे पाठपुरावा चालू आहे तसेच येणार्या हिवाळी अधिवेशनात या बर्धार्या सदर्भात प्रस्ताव मांडणार आहे त्या सदर्भात तारांकीत प्रश्न पाठवला असल्याचे मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सा.चकमकशि बोलताना सांगीतले आहे 

पूर्णा नदीपात्रातील बंधार्याचे नव्याने पूनरजीवन करणे गरजेचे आहे उच्च पातळी बंधार्यात रूपांतर केले तर शेतकर्याचे भरघोस उत्पादन वाढेल पर्यानाने शेतकरी समृध्द होऊन त्याची आर्थाक ऊन्नती होईल 
किशोर खंदारे संस्थापक अध्यक्ष्य

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....