परतूर -मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडा,.आ.सुरेश जेथलिया यांचे विरोधी पक्ष नेते मा.वीजय वडेट्टीवर यांना साकडे
जालना प्रतिनिधी समाधान खरात
जिल्हात दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा आणि शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ही पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयजी वडेट्टीवार हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते.
तसेच परतूर व मंठा तालुक्यात देखील अवकाळी पाऊसाने कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून देखील परतूर -मंठा तालुके शासनाने अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त तालुक्यातुन वगळले असून त्या तालुक्यांचा देखील सहभाग करण्यात यावा या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवावा या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना मा. आ. सुरेश जेथलिया यांनी निवेदन देत मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्यान देण्याची विनंती केली. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.