ॲड.सुनिल जाधव यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ट मराठवाडा विभाग सह संयोंजक पदी नियुक्ती...
.परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
पांगरी गोसावी येथील ग्रामीण भागातील तालुका मंठा एका शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित ॲड. सुनिल जाधव यांची मराठवाडा विभागावर नियुक्ती ,अभाविप पूर्व कार्यकर्ते विद्यार्थी चळवळीतुन आलेलं नेतृत्व तसेच यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर , सिनेट पदवीधर निवडणुक लढलेले ॲड. सुनिल जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मान्यतेने मराठवाडा विभाग संयोजक योगेशजी जगताप यांनी ॲड सुनिल जाधव यांची मराठवाडा विभाग भाजपा पदवीधर प्रकोष्ट सह संयोंजक पदी नियुक्ती केलेली आहे .
एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना विभागावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष श्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि न्याय ,हक्क मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील.असे नवनियुक्त ॲड. सुनिल जाधव यांनी सांगितले .