नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील- संतराम आखाडे : गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
,दि.१४ - पीकविमा,दुष्काळी अनुदान, घरकुल योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे यासह विविध समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून या समस्या जाणून घेण्यासाठी थेट गावपातळीवर जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संतराम आखाडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
यासंदर्भात आखाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गावागावात शेतकऱ्यांचे,सुशिक्षित बेरोजगार युवकांचे अनेक प्रश्न यासह अनेक प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत.पीक विमा,दुष्काळी अनुदान, अतिवृष्टी अनुदान, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.ग्रामीण भागासह शहरी भागातील घरकुल योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अपंगांचे प्रश्न,विविध कर्ज प्रकरणे, शिधापत्रिका असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
या प्रश्नांवर चर्चा करणार असून हे सर्व प्रश्न आगामी काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. यासाठी दोन दिवसांचा दौरा करणार असून १५ डिसेंबर रोजी आष्टी,कोकाटे हदगाव व श्रीष्टी गटाची तर दि.१६ रोजी सातोना व वाटूर या ठिकाणी बैठक घेण्यात येणार आहे.बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सुभाष भदरगे,चंदर आखाडे,मुरलीधर डव्हारे,राहुल दवंडे,जीवन सदावर्ते इतरांनी केले आहे.