जालना पीपल्स बँक निवडणूक; पत्रकार विकासकुमार बागडी यांचा अर्ज मंजूर
जालना प्रतिनीधी (समाधान खरात)
येथील पत्रकार वीकास बागडी यांनी दाखल केलेला अर्ज निवडणूक अधिकार्यांनी मंजूर केला असून श्री. बागडी यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ देखील केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना पीपल्स बँक निवडणूकीत यावेळी आपण आपले भविष्य आजमाविण्याचा निर्धार श्री. बागडी यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज निवडणूक अधिकार्यांनी मंजूर केल्यामुळे आता श्री. बागडी यांनी आपल्या प्रचारास सुरुवात देखील केली आहे. जालना पीपल्स बँक ही व्यापार्यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांचे कामे झाली पाहिजेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे श्री. बागडी यानी म्हटले आहे.