४०० खासदार आणि २०० आमदारांसाठी युवा मोर्चा ने सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवा मोर्चाची भूमिका निर्णायक - प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकसनशील असलेला भारत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे २०१४ व २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पूर्ण बहुमतातील सरकार देशात स्थापन केले त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या सर्वांच्या समोर असून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ४०० खासदार आणि महाराष्ट्रात २०० आमदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असून आपल्या मेहनतीच्या बळावर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होईल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले

परतुर येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्त पत्र वाटप व सत्कार कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष संपत टकले भाजपा परतुर तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे महिला आघाडी प्रदेश सचिव जिजाबाई जाधव किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अंकुशराव बोबडे युवा मोर्चा परतुर तालुकाध्यक्ष भागवत मानवतकर मंठा तालुकाध्यक्ष विलास घोडके जालना तालुकाध्यक्ष विनोद राठोड यांची उपस्थिती होती

यावेळी बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण जगभरात भारताचा दबदबा निर्माण झाला असून भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी पंतप्रधान मोदीजी प्रयत्नशील आहेत आयोध्यातील प्रभू श्रीराम चंद्राचे मंदिर असो की काश्मीरमधील ३७० कलम मुस्लिम महिला भगिनींसाठी चे तीन तलाक चा कायदा असो की चीन पाकिस्तान बाबतची भारताची भूमिका सर्वच बाबतीत भारताचा वचक सर्वत्र दिसून येतो आहे ही बाब सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

यावेळी बोलताना भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर म्हणाले की युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरापासून विधानसभा व लोकसभा स्तरापर्यंत बूथ रचना मजबूत करणे अपेक्षित आहे त्यासाठी पक्षाकडून आलेल्या विविध सूचनांचे सर्वांनी यथोचित पालन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. महा विजय २०२४, नमो चषक स्पर्धा, सरल ॲप, नमो ॲप, मंडल सशक्तीकरण, नव मतदार नोंदणी या सर्व सोशल मीडिया प्रभाव देणे राबवण्यासाठी युवा मोर्चा ने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे तसेच पक्षाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा ची महत्त्वपूर्ण जबाबदारी व निर्णय भूमिका असणार आहे असेही यावेळी श्री राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले

यावेळी पद्माकर कवडे प्रकाश टकले, विक्रम उफाड, विजय खटके, शिवराज नारियलवाले, विकास पालवे, रामेश्वर काळे रोहन आकात महादेव वाघमारे विवेक काकडे गणेश कदम रामेश्वर सोळंके संदीप हिवराळे गजानन उफाड तुकाराम सोळंके सचिन राठोड अनिल चव्हाण अमोल मोरे महादेव आटोळे अजीम पटेल आश्विनी आंधळे, सुनयना दवणे विलास भुतेकर शरद पाटील ज्ञानेश्वर गोंडगे, अमोल जोशी, बाळासाहेब बहिर ,जयराम मिसाळ रामदास ढाकणे, विलास चव्हाण लहू आढे, माजेद खा पठाण मयुरी तौर, सविता नवल कृष्णा यादव, देविदास करडे, सुरेश पोटे, योगेश भले, विजय पवार राहुल काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....