देशात २२ जानेवारीला रामराज्य स्थापन होईल- ह.भ.प.रुपालीताई सवने
प्रतीनीधी समाधान खरात
भोकरदन - देशातील तरुणांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्यावा. देशाने आपल्यासाठी काय केले हा विचार केल्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, हा विचार तरुणांनी करावा. तसेच २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन होत आहे. त्या दिवसापासून देशात रामराज्य स्थापन होईल, असे प्रतिपादन ह.भ.प. रुपालीताई सवने यांनी केले.
भोकरदन शहरात स्व.भिकनराव श्रीनिवासराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त लक्ष्मणराव देशमुख, राम देशमुख यांच्या वतीने ह.भ.प.रुपालीताई सवने परतुरकर यांचे किर्तणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या किर्तनात विष्णु महाराज सास्ते, गोरक्षनाथ महाराज, शंकर महाराज साबळे, सोमनाथ महाराज सहाने, दत्ता महाराज, नितीन महाराज, संतोष महाराज, साहेबराव बारोकर, प्रभाकर तळेकर यांच्यासह नागेश्वर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्यांना सहकार्य केले.
पुढे बोलतांना रुपालीताई सवने म्हणाल्या की, नव्या वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. 500 वर्षानंतर राममंदिर लोकार्पणाचा हा अविस्मरणीय प्रसंग साजरा करण्यासाठी प्रत्येक दिवे लावून आनंदोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आजच्या युगात प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्रभू रामचंद्राचा आदर्श ठेवून लोकहितार्थ कार्य करावे.
तसेच युगात मानवाचे जीवन दिशाहीन होते असून मनुष्य क्रोध अहंकार, व्देष, मत्सर, या वाईट विचाराने भरकटत चालला असून अति धन कमविण्याच्या नादात मानसाचे मानसावरील प्नेम दिवसेनदिवस कमी होत चालल्याने मनुष्य संस्कार, संस्कृती पासून दूर जात असून आजच्या मानसाला संताच्या विचार आत्मसात करण्याची अंत्यंत गरज आहे. आज अनेकांना जगावं कसं हेच कळत नाही. प्रत्येक माणूस आज पैशाच्या हवसापोटी अहोराञ धावतो. परंतु संतती कडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. जगण्यासाठी प्रत्येकाला पैसा आवश्यक आहे. पण नित्यमत्तेचा पैसा टिकतो तर लुबाडुन जमा केलेल्या पैशाचा नाश करण्यासाठी तुमची संतती व्यसनाधीन होत असल्याचे सांगितले. शब्द हे शस्त्र होतात तर प्रेमाने शब्द धनाचे भांडार होतात. शब्दांमुळे माणूस माणसात बसतो आणि शब्दामुळेच माणसातला माणूस माणसातून उठतो घराघरात कलह शब्दामुळेच निर्माण होतात. असल्यामुळे माणूस माणसापासून दूर जात असल्याचे सांगितले. प्रपंचाचा व्याप सोडून संताच्या विचारांची शिदोरी घेऊन भगवंताचे नामस्मरण करीत रहावे असे, असे रुपालीताई सवने सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक रणविरसिंह देशमुख, प्रतिक देशमुख, प्राचार्य डि.एस.फोलाने, प्रकाश देशमुख, इंद्रजीत देशमुख, रोशन देशमुख, गौरव देशमुख, अरुण तळेकर आदींची उपस्थित होते.